मुख्यपृष्ठSENSEX • इंडेक्स
add
बी.एस.ई. सेन्सेक्स
याआधी बंद झाले
७७,३७८.९१
आजची रेंज
७६,५३५.२४ - ७७,१२८.३५
वर्षाची रेंज
७०,००१.६० - ८५,९७८.२५
बातमीमध्ये
बद्दल
बी.एस.ई. सेन्सेक्स हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आहे. आशियातील सर्वात प्राचीन अशा बी.एस.ई.ची स्थापना १८७५ मध्ये बीएसई लिमिटेड या रूपात झाली होती. भारतीय शेअर बाजाराच्या वाटचालीत या एक्सचेंजचे कार्य मोलाचे असे आहे आणि याचा निर्देशांक जगभर नावाजलेला आहे. हा निर्देशांक मुंबई शेअर बाजारातील सर्वात मोठ्या व प्रतिष्ठित ३० भारतीय कंपन्यांवर आधारित आहे. ह्या ३० पैकी अनेक कंपन्यांच्या शेअर्सची सर्वाधिक उलाढाल केली जाते. १ एप्रिल १९७९ रोजी १०० अंकांसह सेन्सेक्सची सुरुवात झाली. आशियातील सर्वात जुना आणि देशातील पहिला असलेल्या या स्टॉक एक्सचेन्जला बी.एस.ई. लिमिटेड सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट कायदा, १९५६ अन्वये कायमस्वरूपी मान्यता मिळालेली आहे. या एक्सचेंजचा गौरवशाली इतिहास सव्वाशे वर्षांपेक्षा जुना आहे. भारतामध्ये अशी एखादी कंपनी नसेल जिने भांडवल उभारण्यासाठी बी.एस.ई.ची सेवा घेतलेली नाही. बी.एस.ई. हे भारतीय कॅपिटल मार्केटचे प्रतीक मानले जाते. बी.एस.ई.चा निर्देशांक हा देशाच्या अर्थव्यवस्थेचे आणि वित्तबाजारातील उलाढालीचे प्रतिबिंब दर्शविणारा बेंचमार्के इक्विटी निर्देशांक आहे. Wikipedia